परदेशात नोकरीच्या बहाण्याने 
फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मस्कत, ओमान या ठिकाणी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोघांना काशी मिरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. कर्नाटक येथे राहणारा अश्रफ कैवौरा व मुंबईतील घाटकोपर येथे राहणारी महिला नमिता मालुसरे या दोघांनी मिरा रोड येथे राहणाऱ्या एका महिलेला मस्कत येथे महिना ३० हजार रुपयांची नोकरी देतो, असे प्रलोभन दाखवले होते. त्यानुसार महिलेला ओमानला पाठवण्यात आले; मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर या महिलेला तीन लाख रुपयांना विकण्यात आले असून पडेल ते काम करावे लागेल व भारतात परत जायचे असेल तर तीन लाख रुपये परत करावे लागतील, असे ओमानमधील दलालाने तिला सांगितले.

महिलेने मस्कत येथे तिच्या ओळखीच्या लोकांकडून पैशांची मदत मागितली व दलालाला एक लाख ६५ हजार रुपये देऊन स्वत:ची सुटका करवून घेतली. भारतात परत आल्यानंतर महिलेने काशी मिरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपास केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी काशी मिरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज जगताप पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com