अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे राष्‍ट्रीय लाईनमन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे राष्‍ट्रीय लाईनमन दिन
अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे राष्‍ट्रीय लाईनमन दिन

अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे राष्‍ट्रीय लाईनमन दिन

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : अदाणी इलेक्ट्रिसिटीने राष्ट्रीय लाईनमन दिन साजरा करताना लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही लाईनमनचा यानिमित्ताने सत्कार केला. भूमिगत तसेच जमिनीवरील वीजवाहिनी आणि सहाय्यक उपकरणे, दुरुस्ती तसेच देखभाल करण्यासाठी लाईनमन सतत काम करतात. याव्यतिरिक्त ते भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी खंदक खोदतात, तसेच मीटर बसवतात. ओव्हरहेड लाईन दुरुस्तीसाठी प्रसंगी त्यांना खांबावर चढून वीजवाहिन्यांची तपासणी करावी लागते. लाईनमनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेशिवाय मुंबईकरांचा विश्वासार्ह आणि अखंड वीजपुरवठा अशक्य आहे. या भूमिकेतून चांगले काम करणाऱ्या लाईनमनचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुंबईची भिस्त असलेले लाईनमन हे ऊर्जायोद्धे आहेत, अशा शब्दांत अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यांनी त्यांचा गौरव केला.