सेवानिवृत्त प्राध्यापकाचा चौलमध्ये मृत्यू

सेवानिवृत्त प्राध्यापकाचा चौलमध्ये मृत्यू

अलिबाग, ता. ५ (बातमीदार)ः चौलमध्ये फिरण्यास आलेल्या एका वयोवृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. दिलीप कणेकर (७९) असे या पर्यटकाचे नाव असून शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी आपल्या तीन मित्रांसमवेत ते चौल येथे फिरण्यास आले होते.
चौल येथील भाटगल्लीमध्ये असलेल्या सिल्व्हासा रिसॉर्टमध्ये रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिलीप कणेकर अचानक बेशुद्ध पडले होते. या वेळी त्यांच्या मित्रांनी तत्काळ त्यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच ते मृत झाले होते. या वेळी अलिबाग पोलिसांनी कणेकर यांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कणेकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले. रेवदंडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com