शरद पवार शुक्रवारी मोखाड्यात

शरद पवार शुक्रवारी मोखाड्यात

मोखाडा, ता. ५ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १० मार्चला मोखाडा तालुक्यात येणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन संकुलाच्या उद्‌घाटनासाठी पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी दिली. या पार्श्वभूमीवर या संकुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आमदार भुसारा यांनी पाहणी केली असून महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार पहिल्यांदाच मोखाडा तालुक्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आनंदाचे वातावरण असून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व कामाला लागल्याचे दिसत आहे. मोखाड्यात रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाचे जाळे पसरवून येथील आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहचवली आहे. आता या शिक्षण संस्थेच्या संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या संकुलाच्या उद्‌घाटनासाठी दस्तरखुद्द रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार येणार असल्याने महाविद्यालयाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com