चोरांकडून १३ सायकली जप्त

चोरांकडून १३ सायकली जप्त

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : शहरातील तीन सोसायट्यांमधून सायकल चोरीच्या तक्रारी आल्याने पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून दिवा येथून दोघांना अटक केली. यातील एक जण अल्पवयीन असल्याने त्याला समजून देत पालकांच्या ताब्यात देण्यात आले; तर हसमितसिंग सैनी (वय १९) याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रामनगर पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीच्या एकूण १३ सायकली जप्त केल्या.

डोंबिवली पोलिस ठाणे हद्दीतील नंदादीप रुद्रकुटी सोसायटी, जय मधु मिलन सोसायटी, गणेश प्रतिमा सोसायटी, विवेक सोसायटी येथील सायकली चोरीला गेल्याची तक्रारी पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रामनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये दोन संशयित हे सायकल चोरून नेत असल्याचे दिसून आले. आरोपी हे ज्या मार्गाने येतात, त्या मार्गावर पाळत ठेवत शनिवारी (ता. ४) पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com