सामाजिक स्थित्यंतरे साहित्यात उमटण्याची गरज

सामाजिक स्थित्यंतरे साहित्यात उमटण्याची गरज

पालघर, ता. ८ (बातमीदार) : समाजात अनेक बऱ्यावाईट घटना दररोज घडत असतात आणि आपण त्या पाहत, ऐकत असतो. अशा घटनांचे प्रतिबिंब समाजमनांमध्ये उमटत असते. त्या घटना शब्दबद्ध व्हाव्यात अशी लोकांची लेखकांकडून अपेक्षा असते. ही अपेक्षापूर्ती करणारे लिखाण आपल्याकडून व्हायला हवे, कारण हे लिखाण भावी पिढीसाठी अनमोल ठेवा असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषद, पालघर शाखा व पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत मधुसूदन राऊत ऊर्फ बापटभाऊ वाचन कट्टा, केळवे येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
लेखकाने लोकजीवनाचे चित्रण आपल्या लेखनातून प्रकट करावेच; पण त्याचबरोबर आपल्या साहित्यात वैश्विक मूल्यांच्या अंतर्भावाचाही आग्रह धरावा. आपले लेखन जेव्हा सत्याला सामोरे जाते तेव्हाच ते वाचकांच्या मनाचा ठाव घेते, असेही मार्टिन यांनी सांगितले. गेल्या ३२ वर्षांपासून केळवे आणि परिसरात साहित्यिक चळवळ अखंडितपणे सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी इथल्या साहित्यिकांचे कौतुक केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्रवीण दवणे, रमाकांत पाटील, जमील शेख, प्रा. अशोक ठाकूर, प्रा. स्मिता ठाकूर, प्रकाश वैद्य, कमलाकर राऊत, कुंदा ठाकूर, भावना पाटील, जितेंद्र राऊत, जयप्रकाश पाठक, सुमती वर्तक, संध्या सोंडे, विनय पाटील, हेमंत राऊत, उमेश कवळे, स्वाती भोईर, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

--------------------------
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
कार्यक्रमात केशवसुत स्मारकाच्या उद्‍घाटनप्रसंगी केलेल्या कुसुमाग्रजांच्या भाषणाचे अनंत पाटील यांनी केलेले वाचन, मुकेश पाटील व विलास ठाकूर यांनी सादर केलेले नटसम्राट नाटकातील नाट्यप्रवेश, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असा आग्रह धरणारे सुधाकर ठाकूर यांचे भाषण, प्रा. स्मिता पाटील, अंजली मस्कारेहन्स व विजय पुरव यांच्यासह सुमारे ३० कवींनी सादर केलेल्या कविता व साहित्यिकांचे सत्कार ही कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. तीन तासांच्या भरगच्च कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com