विभागीय बाल महोत्सवात पालघरचा झेंडा

विभागीय बाल महोत्सवात पालघरचा झेंडा

विरार, ता. ८ (बातमीदार) : मुंबईतील मानखुर्द येथे पार पडलेल्या विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवात पालघर जिल्ह्यातील बालगृहातील बालकांनी नेत्रदीपक कामगीरी करून यश मिळवले. या सर्व बालकांचे विभागीय उपआयुक्त कार्यालयामार्फत व संस्थेकडून अभिनंदन करण्यात आले. विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवाकरिता पालघर जिल्ह्यातील श्री गिरीवासी प्रगती मंडळ बालगृह, रेस्क्यू फाऊंडेशन मुलींचे बालगृह, करुणा वेल्फेअर मुलांचे बालगृह आणि गुड शेफर्ड मुलींचे बालगृह या संस्थेतील बालकांनी कबड्डी, खो-खो, रीले, २०० मीटर धावणे, कॅरम, गोळाफेक या खेळात प्रथम क्रमांक मिळवला व तसेच गिरीवनवासी प्रगती मंडळ या बालगृहाचे बालकांनी सादर केलेले तारपा या नृत्यास विशेष आकर्षण म्हणून तृतीय क्रमांक मिळाला आहे. विभागीय बाल महोत्सवात सर्वाधिक पदकांची कमाई करत मानाची फिरती ढाल पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याला मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com