विक्रमगडमध्ये दोन हजार होळ्यांचे पूजन

विक्रमगडमध्ये दोन हजार होळ्यांचे पूजन

विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात व परिसरात होळी व धुळवड शांततेत पार पडली. ग्रामीण भागात व शहरी भाग मिळून दोन होळ्या पूजण्यात आल्या. शहरी भागाच्या गल्ली-बोळांत, सोसायट्यांमध्ये, बिल्डिंगसमोर; तर विक्रमगड शहरातील पूर्वीपासून जुनी असलेली ब वॉर्डातील तसेच विठ्ठलमंदिर शेडमध्ये १९८४ पासून सुरू झालेली होळी तसेच शंकर मंदिर, पाटीलपाडा, दगडीचाळ येथे होळी पूजन करण्यात आले. ग्रामीण भागात गाव खेड्यांवर मोकळ्या जागेत या होळ्या लावण्यात आल्या. होळीनंतर मंगळवारी सकाळपासूनच धूलिवंदनाला सुरुवात झाली. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस अधिकारी प्रदीप गीते यांनी सांगीतले. दरम्यान, होळी व धुळवड विक्रमड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले, तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांत प्रामुख्याने ग्रामीण खेड्यापाड्यांत आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे, ओंदे आदी भागांत आजही पारंपरिक पद्धतीनेच सण साजरे करण्यात आले. या गावात एक गाव होळीची परंपरा आजही आबाधित ठेवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com