डहाणूत कायदा, आरोग्याबाबत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत कायदा, आरोग्याबाबत जनजागृती
डहाणूत कायदा, आरोग्याबाबत जनजागृती

डहाणूत कायदा, आरोग्याबाबत जनजागृती

sakal_logo
By

डहाणू, ता. ८ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डहाणू एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यास महिलांना कायदेविषयक व आरोग्यविषयक तसेच त्यांच्या विविध समस्याविषयक मार्गदर्शन करण्यात आले. डहाणू पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला डहाणू एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी तेजस्विता करंगुटकर, मुख्य सेविका मीनल राऊत, रूपाली चाकणकर, ॲड. अमिता दळवी, जलसाक्षी फाऊंडेशनच्या वर्षा पाटील, पंचायत समिती सदस्य काजल राबड, शिक्षण विस्तार अधिकारी रत्ना शिरसाट यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
या महिला मेळाव्यात ॲड. अमिता दळवी यांनी महिलांना कायदे आणि विधीविषयक सल्ला दिला. हुंडा प्रतिबंधक कायदा, स्त्री हक्क कायदा, मालमत्ता अधिकार, वारसा हक्क, विवाह कायदा, घटस्फोट, पोटगी, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायदा अशा स्त्रियांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्यांची अनेक प्रकारचे दाखले देत त्यांनी मार्गदर्शन केले; तर वर्षा पाटील आणि मान्यवर महिलांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर मोलाचे केले.