अंबाडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात औषधसाठा

अंबाडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात औषधसाठा

वज्रेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील अंबाडी-दिघाशी रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शासकीय औषधांचा साठा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडला आहे. शासनाच्या आरोग्य विभागातून देण्यात येणाऱ्या फॉलिक ॲसिडच्या या गोळ्या आहेत. याबाबत माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार आणि सुनील लोणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कावळे आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत माहिती देऊन पंचनामा करत औषधे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली.

शासनाचा ॲनिमियामुक्त भारत अभियानांतर्गत बालक सदृढ आणि ॲनिमियामुक्त जन्माला यावे म्हणून लोह आणि फॉलिक ॲसिड तसेच पोषण आहार देण्याचे उपक्रम जाहिरातीत पाहायला मिळतात. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच आहे. असाच प्रत्यय अंबाडी येथे आला. अंबाडी गावातील नाझिब धुरू या तरुणाने प्रमोद पवार यांना माहिती देऊन रस्त्याच्या कडेला औषधे पडलेली असल्याचे सांगितले. त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना व पोलिसांना ही गोष्ट लक्षात आणून दिली. गोळ्या ज्या ठिकाणी पडलेल्या होत्या हे अंतर अंबाडी ग्रामीण रुग्णालयापासून ५०० मीटर अंतरावर आहे, असे त्यांनी सांगितले. या गोळ्या हिंदुस्थान लॅबोरेटरी पालघर या ठिकाणी तयार होऊन शासनाकडे आल्यानंतर त्या संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे इत्यादी विभागांत पाठवल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com