स्मशान प्रदूषणमुक्तीसाठी पावले

स्मशान प्रदूषणमुक्तीसाठी पावले

वसई, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने पर्यावरणाचा ऱ्हास व वायुप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गॅसदाहिनीच्‍या माध्‍यमातून पुढाकार घेतला आहे. या प्रकल्‍पाला २०२१ मध्‍येच सुरुवात करण्‍यात आली; परंतु परंपरांच्‍या जोखडात अडकलेल्या‍ नागरिकांकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आजही पारंपरिक पद्धतीनेच अंत्यविधी करण्याची लोकांची मानसिकता असल्‍याने शहरातील स्‍मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडांचाच वापर केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असून पालिकेने आता पर्यावरणपूरक मोहिमेच्‍या दिशेने पावले उचलली आहेत. याबाबत शहरात सर्वत्र व्यापक स्वरूपात जनजागृती करण्‍यात येत असून, ‘प्रदूषणमुक्त स्मशान मिशन’ राबविण्यासाठी प्रशासनाकडून विविध संकल्पना मांडण्‍यात आल्‍या आहेत.

एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या मृत्यूनंतर स्‍मशानभूमीत त्‍याच्‍यावर अंत्यसंस्कार करण्‍यात येतात. मात्र, अशा प्रसंगीही अनेकदा मृतांच्‍या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वसई, वालीव, पेल्हार, विरार, नालासोपारा, चंदनसार, बोळींज, नवघर, माणिकपूर, आचोळे प्रभाग समितीत शवदाहिनी आहेत. यातील पाच ठिकाणी गॅसदाहिन्या आहेत. लाकडाचा वापर कमी व्हावा, धूर पसरू नये व पर्यावरणाला बाधा निर्माण होऊ नये म्हणून ही व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे; परंतु मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अधिक लाकडाचा वापर केला जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्यावर जनजागृतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
-----------------------------------
सार्वजनिक ठिकाणी जागृती
घरोघरी नागरिकांना भेटून, सार्वजनिक ठिकाणी, स्मशानभूमीजवळ फलक लावण्यात येणार असून यात गॅसदाहिन्यांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासन करणार आहे. पालिका प्रशासनामार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही गॅसदाहिनी सुविधेच्‍या वापरात २०२१ पासून घट झाली आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने नागरिकांना साद घातली असून, आता या मोहिमेला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. गॅसदाहिन्यांमुळे अंत्यसंस्कार करताना निघणारा धूर हा बाहेर पडणार नाही व जे धुरामुळे प्रदूषण निर्माण होते त्याला आळा बसेल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
-----------------------
नागरिकांना साद
वसई-विरार महापालिका देहदान, अवयव दानासाठी उपक्रम हाती घेत प्रोत्साहन देत असताना स्म्शानभूमीतही मृतांवर गॅसदाहिन्यांच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेत आहे. शहरातील नागरिकांनी साथ दिल्‍यास पर्यावरण राखण्‍यास मोठा हातभार लागणार आहे.
------------------------------------------
कोरोना काळात अधिक वापर
कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून गॅसदाहिनी असलेल्या स्मशानभूमीचा वापर अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून आले होते. कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांवर गॅसदाहिनी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यामुळे कोरोना काळात गॅसदाहिनीचा वापर अधिक झाल्याचे दिसून आले.
------------------------------------------
कोट
अंत्यसंस्कार करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने स्‍मशानभूमीत गॅसदाहिन्या बसविल्या आहेत. याचा वापर मृतदेहासाठी करण्यात यावा म्हणून नागरिकांत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे.
- डॉ. किशोर गवस, उपायुक्त
----------------------
पर्यावरणपूरक गॅसदाहिन्या
वसई पाचूबंदर
नवघर पूर्व
विरार विराट नगर
नालासोपारा समेळ पाडा
आचोळे
--------------------------------
दोन कोटी १२ लाख खर्च
---------------------
प्रगतिपथावर असलेल्या गॅसदाहिन्या
वसई बेनापट्टी
फुलपाडा, विरार
१ कोटी ४६ लाख खर्च
-----------------
आकडेवारी
गॅसदाहिनी अंत्यसंस्कार आचोळे ४५०
वसई पाचूबंदर ५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com