४,५०० कोटींचा मालमत्ता कर वसूल

४,५०० कोटींचा मालमत्ता कर वसूल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची ४,५०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. एप्रिल २०२२ ते ८ मार्च २०२३ या कालावधीत हा मालमत्ता कर जमा झाला आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत मालमत्ता करवसुलीचा ६ कोटींचा टप्पा पार करण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.

जकात करवसुली बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हेच पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे; मात्र ५०० चौरस फुटांखालील घरांना करमाफी दिल्याने पालिकेला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. करमाफी दिल्याने पालिकेला वर्षाला ४६४ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे उर्वरित मालमत्ता धारकांकडून वर्षाला सहा हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत मालमत्ता कर वसुलीचा सहा हजार कोटींचा टप्पा पालिकेने गाठला होता.

मुंबईत साडेतीन लाख मालमत्ता असून या मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्यात येतो. पालिकेच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवर होणारा खर्च पाहता मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. यंदा ८ मार्चपर्यंत ४,५०० कोटी रुपये मालमत्ता कर रूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून, उर्वरित १,५०० कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत जमा करण्याचे आव्हान असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com