मुलाच्या अपहरणप्रकरणी
आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत

मुलाच्या अपहरणप्रकरणी आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत

मुंबई, ता. ९ : गोवंडी परिसरातून दोन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. मलिकराम यादव (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मुलाची सुटका करण्यात आली. मूल होत नसल्यामुळे त्याने या मुलाचे अपहरण केल्याचे पोलिस चौकशीत कबूल केले.
गोवंडी येथील दोन वर्षांचा मुलगा ३ मार्च रोजी घराबाहेर खेळत होता. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले. मुलगा सापडत नसल्याने आई-वडिलांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसी टीव्हीची तपासणी केली असता आरोपी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेल्याचे उघड झाले. पुढे तांत्रिक तपासाद्वारे आरोपी लखनौ येथे असल्याचे समजले. शिवाजी नगर पोलिसांनी लखनौला जात आरोपीला मुलासह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com