कर न भरल्याने  मालमत्ता सील

कर न भरल्याने मालमत्ता सील

खारघर, ता. ९ (बातमीदार) : मालमत्ता कर भरणा केला नाही म्हणून पनवेल महापालिकेने आज दुकानाचे गाळे सील करण्यास सुरुवात केल्याने मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाचा निकाल मालमत्ताधारकांच्या बाजूने लागेल, अशी आशा मालमत्ताधारकांना असल्यामुळे बहुतांश जणांनी कर भरलेला नाही. महापालिकेद्वारे मोबाईलद्वारे कर भरण्याबाबत मेसेज पाठवले जात आहेत. आज महापालिकेने खारघर, सेक्टर १३ मधील पॅसिफिक इमारतीमधील दुकान क्रमांक ११० मालमत्ता कर न भरल्यामुळे सील केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com