प्रस्थापितांमुळे डॉ. रखमाबाईंचा इतिहास दाबला

प्रस्थापितांमुळे डॉ. रखमाबाईंचा इतिहास दाबला

प्रस्थापितांमुळे डॉ. रखमाबाईंचा इतिहास दाबला
महिला दिनी डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केली खंत

बोर्डी, ता. ११ (बातमीदार) : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी ओळखल्या जातात. असे असले तरी आपल्याकडील रखमाबाई सावे-राऊत या प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या; मात्र त्या काळच्या प्रस्थापित वर्गाने त्यांची माहिती दाबून ठेवल्याने त्या प्रकाशझोतात आल्या नाहीत, अशी खंत डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केली. डहाणू येथे कोकण मराठी साहित्य परिषद, डहाणू शाखेतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विशेष अतिथी म्हणून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी ‘महिलांचे अधिकार व स्वातंत्र्य’ या विषयावर परखडपणे आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोमसाप पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे, प्रमुख अतिथी म्हणून कोमसाप केंद्रीय ग्रंथसमिती प्रमुख प्रा. अशोक ठाकूर, डहाणू शाखा डॉ. अंजली मस्करेन्हस, तलासरी येथील परुळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान राजपूत, पोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र बागेसर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अंजली मस्करेन्हस यांनी महिलांचे हक्क व अधिकाराबाबत सुरुवातीपासूनच्या चळवळीची माहिती सादर केली. त्यानंतर डॉ. राजपूत यांच्या पालघर जिल्ह्यातील माच्छी-मितना समाज, लोकजीवन व लोकसाहित्य या पुस्तकाचे, तसेच अनुपमा जाधव यांच्या ‘रानझरा’ या‌ काव्यसंग्रहाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी दिलीप जोंधळेकर, अनुराधा धामोडे, सदाशिव कुलकर्णी, वसंत तांडेल, अभिजीत देशपांडे यांनी महिला दिनाबाबत माहिती व काव्य सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे प्रा. अशोक ठाकूर यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून देताना महिला करीत असलेल्या उत्तुंग भरारीबद्दल गौरवोद्गार काढले. या प्रसंगी शाखा प्रतिनिधी वीणा माच्छी, डहाणू शाखा कार्याध्यक्षा मेघा पाटील, डहाणू तालुका सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे, माच्छी-मितना समाजाचे पदाधिकारी मुरलीधर माच्छी, माजी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, डॉ. रोमिओसर, माजी मुख्याध्यापक ताजणे सर, विजय चव्हाण दाम्पत्य, प्रा. महेंद्र कडूसर, केळवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विनोद पाटील, तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह प्रीती राऊत यांनी केले; तर रजनी ताजणे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com