कशेडी घाटात टेम्पोची तीन वाहनांना धडक

कशेडी घाटात टेम्पोची तीन वाहनांना धडक

पोलादपूर, ता. ११ (बातमीदार) : कशेडी घाटात तिहेरी अपघात झाल्याची घटना कशेडी बंगला गाव हद्दीत घडली आहे. कशेडी घाटामध्ये पोलिस मदत केंद्राजवळून शुक्रवारी (ता. १०) रात्री चालक योगेश बाजीराव राजपुरे (वय २४, रा. महाबळेश्वर, जिल्हा सातारा) हा भिवंडीतून गोवा येथे टेम्पो चालवत घेऊन जात होता. गोवा दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचालकाच्या बाजूने ठोकून पुढे जाऊन टँकरला ठोकर दिली. त्यापुढे जाऊन मुंबई बाजूकडे येणाऱ्या टेम्पोने ठोकून तिहेरी अपघात केला. या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक फौजदार सुर्वे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या अपघातामध्ये टेम्पोचालक योगेश राजपुरे याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला जगद्गुरू स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले. या अपघातामध्ये चारही वाहनांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com