एसआरए अधिकाऱ्यांसोबत आठवलेंची बैठक

एसआरए अधिकाऱ्यांसोबत आठवलेंची बैठक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एसआरए कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत शनिवारी (ता. ११) बैठक घेतली. प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, सफाई कामगारांना कायमस्वरूपी घर या विषयावर या वेळी चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना राबवून सफाई कामगारांना हक्काचे कायमस्वरूपी घर देण्यात यावे, अशा सूचना आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी एसआरएचे सीईओ सतीश लोखंडे, डीएफओ रेड्डी, उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर, तहसीलदार उमेश पाटील उपस्थित होते.

कांदळवन जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करणाऱ्या विकसकाला टीडीआर देण्यात यावा. त्यातून कांदळवन जमिनीवरील झोपड्यांचे पुनर्वसन करावे. याबाबत या बैठकीत आठवले यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महापालिकेच्या सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती द्यावी, सफाई कामगारांना पदोन्नतीने लिपिकपदी नियुक्तीसाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात, याबाबतही आठवले यांनी सूचना केल्या. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष सुमित वजाळे, मुंबई सरचिटणीस विवेक पवार, जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे, प्रकाश जाधव, सहदेव कटके, घनश्याम चिरणकर, अलंकार जाधव, सचिन कासारे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com