जलसाक्षी फाऊंडेशनतर्फे महिला मेळावा

जलसाक्षी फाऊंडेशनतर्फे महिला मेळावा

वसई, ता. १२ (बातमीदार) : महिला दिनानिमित जलसाक्षी फाऊंडेशन व एकात्मिक बाल विकास प्रकल्प डहाणू यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने अंगणवाडी कार्यकर्त्‍यांसाठी पंचायत समिती सभागृहगृहात महिला मेळावा अयोजित करण्‍यात आला होता. मेळाव्यासाठी पंचायत समिती सदस्य काजल राबड, बालविकास प्रकल्प अधिकारी तेजस्विता करंगुटकर, जलसाक्षी फाऊंडेशन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पाटील, अॅड. अमिता दळवी, शिक्षण विस्तार अधिकारी रत्ना शिरसाट तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका रूपाली राणा, स्वाती पाटील, मिनल राऊत, गीता गोंधळेकर, शेवंती वाडिया, रामी ओझरे उपस्थित होत्या. या वेळी अंगणवाडी सेविकांमार्फत सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. सर्व रांगोळी कलाकारांना प्रोत्साहनात्मक बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच जलसाक्षी फाऊंडेशनच्या वतीने जवळपास ४० अंगणवाडी सेविकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन मिनल राऊत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com