मुंबई विमानतळ सुसाट

मुंबई विमानतळ सुसाट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए)च्‍या हवाई प्रवासीसंख्येने कोविडपूर्व पातळी पुन्हा ओलांडली आहे. फेब्रुवारीमध्ये २४ हजार २९२ फ्लाइट्समधून ४० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्‍या गेल्‍या वर्षांच्‍या तुलनेत ५७ टक्के अधिक असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
जानेवारीमध्ये वर्षाच्या यशस्वी सुरुवातीनंतर मुंबई विमातळावरून पुन्हा एकदा विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये मुंबई विमानतळावर विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. मुंबई विमातळावरून अंदाजे ७५ टक्के देशांतर्गत प्रवासी वाहतूक आणि उर्वरित २५ टक्के आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीचा वाटा होता. शिवाय, फेब्रुवारी २०२० मध्ये ३० लाख ९० हजार प्रवासी वाहतुकीसह विमानतळाने प्री-कोविड पातळीपेक्षा २ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावर दुबई, लंडन आणि अबू धाबी हे सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत तर देशांतर्गत वाहतुकीसाठी दिल्ली, बेंगळूर आणि गोव्याला सर्वाधिक मागणी आहे. मुंबई विमानतळावरुन सध्या देशांतर्गत ६५ आणि ४७ आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी विमान सेवा चालविण्यात येते. १२ फेब्रवारी रोजी एका दिवसात संपूर्ण देशात २ हजार ९३५ विमानांद्वारे ४ लाख ३७ हजार ८०० प्रवाशांनी प्रवास केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com