कोकण सरस प्रदर्शनाला अल्प प्रतिसाद

कोकण सरस प्रदर्शनाला अल्प प्रतिसाद

तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : ग्रामीण भागातील होतकरू महिलांना व्यावसायिक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने सरस प्रदर्शन विक्री हा उपक्रम आयोजित केला आहे; मात्र आता अंतिम टप्प्यात असणाऱ्या राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना उपलब्ध सुविधा आणि अल्प प्रतिसाद मिळत आहे.

महिलांना अथवा त्यांच्यासोबत मोठ्या अपेक्षेने आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना जाचक अटी लादल्या जात आहेत. सर्वांत आधी या स्टॉलधारकांना निवासाची सुविधा आणि प्रदर्शन केंद्रातील अंतर हे बेलापूर ते वाशी आहे. पुरेशी प्रसिद्धी झाली नसल्याने प्रदर्शनाच्या तुलनेने मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत कमी आहे. या महिलांना खर्च सोडाच किमान रोज वास्तव्याचा खर्चदेखील निघत नसल्याने त्या निराश झाल्या आहेत. तसेच या महिलांना दिलेल्या स्टॉलचा आकार आणि त्यात अन्न शिजवून विक्री करण्यास येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनाने आढावा घेण्याची गरज होती; मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने फक्त सोपस्कार म्हणून हा उपक्रम राबवला जात असल्याची शंका निर्माण झाली आहे. चारशेपेक्षा अधिक स्टॉल या ठिकाणी असताना ग्राहकांनी पुरेशा प्रसिद्धीअभावी याकडे पाठ फिरवली आहे. याबाबत प्रशासनाने योग्य काळजी घेण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.


राज्यात सुमारे पाच लाख ९७ हजार महिला स्वयंसहायता समूह कार्यरत आहेत. यापैकी हजारो महिलांनी प्रदर्शन-विक्री उपक्रमात सहभाग घेतला. महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राबवलेल्या उपक्रमामध्ये पुरेशा सुविधा नसल्याने महिलांच्या पदरी निराशा पडते.
- बाळासाहेब शिंदे,
प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना

सकारात्मक प्रतिसाद
कोकण विभागीय उपायुक्त गिरीश भालेराव व उमेदचे अवर सचिव धनवंत माळी (राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननोन्नती अभियान) यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महिलांच्या समस्या मार्गी लावून बचत गटांना योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com