पाच वर्षीय मुलावर दोघांकडून अनैसर्गिक अत्याचार

पाच वर्षीय मुलावर दोघांकडून अनैसर्गिक अत्याचार

मुंबई ः अंधेरी एमआयडीसी परिसरात पाच वर्षीय मुलावर दोन अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी १५ आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
पीडित मुलाची आई त्याच्या मोठ्या भावाला शाळेतून आणण्यासाठी गेली होती. या वेळी पीडित मुलगा हा घरी एकटाच असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन आरोपींनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास परिसरात बदनामी करण्याची धमकी दिली आणि तेथून पसार झाले. त्यामुळे घाबरलेल्या मुलाने आई घरी आल्यावर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com