विक्रमगड नगरपंचायतीचे समिती सभापती जाहीर

विक्रमगड नगरपंचायतीचे समिती सभापती जाहीर

विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) : विक्रमगड नगरपंचायतीच्या नवनियुक्त समिती सभापतींच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या. या वेळी नगरसेवक अमोल भडांगे यांची बांधकाम, दिवाबत्ती व सांस्कृतिक कार्यक्रम सभापतिपदी, नगरसेवक मनोज वाघ यांची नियोजन, कर विकास व मागासवर्गीय कल्याण समिती सभापतिपदी; तर नगरसेविका अर्चना लोहार यांची महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी निवड करण्यात आली. या वेळी पीठासिन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी व वाडा प्रांताधिकारी भवानजी आगे पाटील यांनी काम पाहिले. या प्रसंगी विक्रमगड नगरपंचायत नगराध्यक्ष नीलेश पडवळे, उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, मुख्याधिकारी अजय साबळे, सर्व नगरसेवक-नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com