भिवंडी बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

भिवंडी बार असोसिएशनची निवडणूक जाहीर

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) ः भिवंडी बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. दोन पॅनलमध्ये होणाऱ्या द्विध्रुवीय निवडणुकीला छेद देण्यासाठी काही अपक्ष उमेदवारांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या वेळची निवडणूक बहुरंगी होणार आहे.

भिवंडी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांतर्गत कामकाज करणाऱ्या वकिलांची भिवंडी बार असोसिएशन ही संघटना आहे. कोविड कालावधीपूर्वी या संस्थेचे ५२५ सदस्य होते. दरम्यानच्या काळात भिवंडीत वाढलेल्या शैक्षणिक सोयीमुळे संस्थेच्या सदस्य संख्येत भर पडून एकूण ८२५ सदस्य झाले आहेत. भिवंडी बार असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेच्या एकूण दहा पदाधिकाऱ्यांसाठी प्रत्येक दोन वर्षांसाठी निवडणूक घेतल्या जातात. त्यानुसार यावर्षी २१ मार्च रोजी निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून वकील केसरी मौर्या व वकील ललिता जोशी यांची नियुक्ती केली आहे. मागील दोन दिवसांपासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात असून बुधवारी (ता. १५) अर्जाची छाननी होणार होती; तर गुरुवारी (ता. १६) अर्ज माघार घेण्याची तारीख असून त्यापुढील दिवस प्रचारासाठी दिले आहेत.

मुख्यत्वे करून या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि पाच सदस्य असे दहा सदस्यांचे कार्यकारी मंडळ असून या पदासाठी ही निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी वकील दिनेश्वर पाटील आणि वकील किरण चन्ने या दोन पॅनल व्यतिरिक्त सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र, या कार्यकारी मंडळात एक पद महिलेसाठी राखीव ठेवले आहे, अशी माहिती वकील मनीष खंडागळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com