नवी मुंबईत बहुमजली पार्किंगची व्यवस्था

नवी मुंबईत बहुमजली पार्किंगची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ ः नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या पार्किंगच्या जागा, त्यामध्ये लागू असणारे दर आणि सिडकोकडून येणारे पार्किंग भूखंडाबाबत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा घेतला आहे. महापालिकेच्या पार्किंगमध्ये आकारण्यात आलेले दर आणि इतर संस्थांच्या पार्किंगमध्ये आकारण्यात आलेल्या दरांची माहिती मागवण्यात आली असून भविष्यात बहुमजली पार्किंगची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.
नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने पार्किंगची समस्या उद्भवत आहे. याकरिता शहरातील पार्किंग व्यवस्थेचे नियोजन हा प्राधान्याने कार्यवाही करण्याचा मुद्दा असल्याचे लक्षात घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली होती. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन व मालमत्ता विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड आणि इतर कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी पार्किंग प्लॉटची विभागनिहाय माहिती घेत अभियांत्रिकी विभागामार्फत २०१६ ते २०१८ या कालावधीत शहरातील वाहनांचे विभागनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल मालमत्ता विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतरच्या काळातही शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असल्याने त्यानुसार नियोजन करावे लागेल, असे नार्वेकर यांनी सूचित केले आहे.
-------------------------------------
सिडकोकडील भूखंडांचा आढावा
सिडकोकडून प्राप्त झालेल्या पार्किंग प्लॉटचा वाहने पार्किंगयोग्य विकास करण्यासाठी बहुमजली पार्किंग सुविधा विकसित करण्यापूर्वी सद्यस्थितीत समांतर पातळीवर वाहने पार्किंग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सिडकोकडून पार्किंगसाठी हस्तांतरित झालेल्या भूखंडांचा पार्किंगयोग्य विकास करण्याप्रमाणेच सिडकोकडे मागणी केलेल्या मात्र अद्याप हस्तांतरित न झालेल्या पार्किंग प्लॉटची यादी तयार करून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत.
----------------------------------------
इतर संस्थांचे दर पडताळणार
सिडको व्यवस्थापनामार्फत वाशी रेल्वेस्थानकनजीक, तसेच इतर ठिकाणी आकारण्यात येणाऱ्या दरांबाबत माहिती घेऊन ती सादर करण्याचे, तसेच त्यांच्या पार्किंग धोरणाचीही माहिती घेण्याचे मालमत्ता विभागास निर्देश देण्यात आले. त्यासोबतच इतर शहरांमधीलही पार्किंग धोरणाविषयी माहिती घेऊन त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा व त्याचा तपशील सादर करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी मालमत्ता विभागास दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com