कोकण भवन, आरटीओत कामांचा खोळंबा

कोकण भवन, आरटीओत कामांचा खोळंबा

वाशी, ता. १५ (बातमीदार)ः जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरू असल्याने त्याचा परिणाम दिसून आला. या वेळी मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या कोकण भवनमधील महसूल, जातपडताळणी आदी कार्यालयांतील दैनंदिन कामे रखडल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी हे सर्व कर्मचारी संपावर आहेत. नवी मुंबईतीलदेखील कोकण भवन, आरटीओ कार्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने त्याचा ताण प्रशासनावर पडला आहे. कोकण भवन येथील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे; तर दुसरीकडे आरटीओ विभागातील कर्मचारीदेखील संपावर असल्यामुळे प्रथम व द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांकडून कारभार हाकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com