तिघा भावांडानी मिळून खोटे कागद पत्र बनवून ५०लाखाला लुबाडले.....

तिघा भावांडानी मिळून खोटे कागद पत्र बनवून ५०लाखाला लुबाडले.....

खोट्या कागदपत्रांद्वारे
५० लाखांची फसवणूक
मालाड (बातमीदार) ः खोट्या कागदपत्रांच्या आधारे मालाडमधील रहिवाशाची ५० लाखांची फसवणूक करणाऱ्या एकाला कुरार पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. मोहम्मद हनिफ इस्माईल पटेल यांची तीन भावंडांनी ५० लाखांची फसवणूक केली होती. ओबेदुल्लाह सौदी, माशिऊल्ला सौदी आणि सलमान सौदी अशी आरोपींची नावे आहेत. ओबेदुल्लाहला कुरार पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे फरार आहेत. आपल्या ओळखीच्या मोहम्मद पटेल यांना आरोपींनी ते राहत असलेल्या पठाण वाडीतील फ्लॅट ५० लाख रुपयांना विकला होता. ठरलेली रक्कमही त्यांनी घेतली. फ्लॅटचा ताबाही त्यांनी पटेल यांना दिला. मात्र वर्ष उलटल्यानंतर फ्लॅटवर बँकेचे कर्ज असल्याचे समजले. कर्ज असतानाही संबंधित सोसायटीचा अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवून खोटे शेअर सर्टिफिकेट व एनओसी बनवून फ्लॅट पटेल यांना विकण्यात आला होता. पटेल यांच्या तक्रारीवर पोलिसांनी ओबेदुल्लाहला अटक केली. सलमान सौदी आणि मशीउल्ला सौदी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com