सीवूड्स स्थानकात प्रवाशांचे हाल

सीवूड्स स्थानकात प्रवाशांचे हाल

नेरूळ, ता. १६ (बातमीदार)ः डी मार्ट, ग्रँड सेंटर मॉल तसेच विविध वाणिज्य संकुले असल्याने नेहमी वर्दळ असलेल्या वाणिज्य सीवूड्स स्थानकातून दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे नेहमी गर्दी असलेल्या या स्थानकामध्ये केवळ एकच तिकीट घर चालू असल्याने तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना रांगा लावाव्या लागत आहेत.
दैनंदिन साफसफाई, बंद इंडिकेटर, बंद पंखे, तुटलेले बाकडे, सुरक्षा भिंत घालूनही रेल्वे लाईन क्रॉस करणे, अपुरी सुरक्षा व्यवस्था अशा विविध समस्या सीवूड्स रेल्वे स्थानकाला भेडसावत आहे. या समस्यांकडे देखभाल दुरुस्ती करणारे ठेकेदार तसेच नियंत्रण करणारे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होत. तसेच स्थानकातील नागरिकांसाठी बसण्यासाठी आसनव्यवस्था तुटलेल्या अवस्थेत असून अपंग प्रवाशांसाठीच्या मार्गावरदेखील सांडपाणी वाहून येत असल्याने पाय घसरून पडण्याचा धोका वाढला आहे.
-----------------------------
सीवूडस स्थानकामधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देखभाल दुरुस्ती करणारे ठेकेदार तसेच अधिकारीवर्गाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
- भरत जाधव, माजी नगरसेवक, भाजप
------------------------------
अनेकदा स्थानकात केवळ एकच तिकीट घर चालू असते. त्यामुळे घाईच्या वेळी रांगेत उभे राहावे लागते. तसेच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील चालू आहेत. त्यामुळे वेळेचा होणारा अपव्यय अधिकच त्रासदायक आहे.
- कुशल घुले, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com