ई-सिगारेटची विक्री करणारा पान शॉपचालक अटकेत

ई-सिगारेटची विक्री करणारा पान शॉपचालक अटकेत

नवी मुंबई (वार्ताहर) : खारघरमधील पान शॉपमधून छुप्या पद्धतीने ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्याला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने छापा मारून अटक केली. मिथलेश माणिकचंद साहू (वय ३९) याच्या पान शॉपमधून सुमारे ४५ हजार रुपयांचे ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेट जप्त करण्यात आले. खारघर सेक्टर ४ मधील भूमी टॉवर येथील सौरभ पान शॉपमधून ई-सिगारेट व विदेशी सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. सय्यद व त्यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १४) पान शॉपवर छापा मारला होता. त्या पान शॉपची तपासणी केली असता, वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि फ्लेवरचे सुमारे ४५ हजार रुपयांचे ई-सिगारेट, विदेशी सिगारेटची पाकिटे सापडली. या प्रकरणी पथकाने पान शॉप चालकाविरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com