घराला लागलेल्या आगीत साहित्य खाक

घराला लागलेल्या आगीत साहित्य खाक

ठाणे, ता. १६ (वार्ताहर) ः शहरातील लोकमान्यनगर परिसरातील चव्हाण चाळीतील एका घराला गुरुवारी (ता.१६) सकाळी साडेसात वाजता आग लागल्याची घटना घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे.

सुरेश मनोहर चव्हाण यांचे लोकमान्य नगर पाडा क्रमांक ३ येथील चव्हाण चाळीत घर आहे. त्यांच्या घरात गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण, घरातील फ्रिज, संगणक, वॉशिंग मशीन, घरातील वीजेची जोडणी, कपाट आणि इतर गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com