लालबाग हत्याकांडात तपासात नवे खुलासे

लालबाग हत्याकांडात तपासात नवे खुलासे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : लालबाग हत्याकांडप्रकरणी तपासानुसार नवी माहिती उघड होत आहे. रिंपल आणि तिच्या आईचे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी तणावपूर्ण संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रिंपलचा मागील तीन महिन्याचा डेटा तपासला. फोनवरून शेवटचं रिंपलच्या संपर्कात आलेल्या त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक सध्या उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे. कानपूरमध्ये आढळलेला तरुण रिंपलचा या हत्याकांडातील साथीदार असू शकतो किंवा ती केवळ त्याच्याशी फोनवर बोलत होती आणि त्या तरुणाचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नसल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आईच्या हत्येप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी रिंपल राहत असलेल्या घरात तपासणी सुरू केली. रिंपल राहत असलेल्या चाळीच्या जवळच एक वडापावचा स्टॉल आहे. त्या स्टॉलवरील मालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की, रिंपल नेहमी त्यांच्या स्टॉलवरून वडापाव घेत होती. १० दिवसांनी रिंपल या वडापावचे बिल ऑनलाईन भरत होती. वडापाव खाऊन झाल्यानंतर त्याचे अनेक पेपरही पोलिसांना रिंपलच्या घरात आढळले. त्यामुळे रिंपल आईच्या हत्येनंतर केवळ वडापाव खाऊन आपले दिवस काढत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कॉल लिस्टमध्ये शेवटचा नंबर
रिंपल सतत ज्याच्याशी कॉलवरून बोलत होती, तो तिचा प्रियकर तसेच या हत्याकांडातील संशयित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणात पंचनामा करताना असेही आढळले, की वीणा जैन यांच्या घरामध्ये बराच काळ कोणीही येताना दिसले नाही. केवळ रिंपलच अगदी कमी वेळा घराबाहेर पडत होती. कानपूरमध्ये आढळलेला तरुण रिंपलचा या हत्याकांडातील साथीदार असू शकतो किंवा ती केवळ त्याच्याशी फोनवर बोलत होती आणि त्या तरुणाचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नसल्याचीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परंतु प्रत्येक संभाव्य गोष्ट तपासण्याची गरज असल्याने, एक टीम कानपूरला पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतदेहाचे तुकडे घरात
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार २७ नोव्हेंबर रोजी रिंपलने तिच्या आईचा खून केला. त्यानंतर तिने मृतदेहाचे तुकडे करून ते घरात विविध ठिकाणी ठेवले होते. तब्बल तीन महिने तिने हे हत्याकांड लपवले होतं. मृतदेहाची दुर्गंधी घालवण्यासाठी तिने २०० अत्तराच्या बॉटल तसंच रुम फ्रेशनर आणले होते. त्या बॉटलचं अजूनही बिल दिलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रिंपलने तिच्या आईच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे बाथरुममधून गटारात टाकले होते. या तुकड्यांमुळे घरातील बाथरुम तुंबलं होतं. बाथरुममधून मृतदेहाचे तुकडे बाहेर जातील असं तिला वाटलं होतं, पण त्याने बाथरुम तुंबलं. त्यानंतर तिने प्रियकराला ड्रेन सक्शन पम्प आणायला सांगितला आणि त्याद्वारे तिने बाथरुम साफ केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com