बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाला अंनिसचा विरोध

बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाला अंनिसचा विरोध

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : बागेश्वर धाम सरकार अर्थात धीरेंद्र कृष्ण शास्त्री गर्ग यांच्या मिरा रोड येथे होणाऱ्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) विरोध केला आहे. जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून शास्त्री यांना अटक करावी आणि त्यांच्या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी अंनिसने पोलिसांकडे केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा मिरा रोड येथील एस. के. स्टोन परिसरात उद्या (ता. १८) आणि १९ मार्चला दिव्यदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक भाजप नेत्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होणार आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिव्य शक्तीचे दावे केले आहेत. समाजमाध्यमांवरील व्हिडीओमध्ये दिव्य दरबारात भूत पळवून लावल्याचे, करणी केल्याचे दावे केले आहेत. अनेक रोगांचे निदान, मंत्राने रोग बरे केल्याचे त्यांनी म्हटले. असे दावे करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने कारवाई करण्यासाठी अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर, चंद्रकांत सर्वगोड, डॉ. प्रकाश ढोकणे, प्रकाश सावंत यांनी मिरा रोड पोलिसांना लेखी पत्र दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com