गुंगीचे औषध देत चालकाची लुट

गुंगीचे औषध देत चालकाची लुट

कासा, ता. १८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गाहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनात अनोळखी प्रवासी बसून काही अंतरावर गेल्यावर वाहन चालकास गुंगीचे औषध देऊन पैसे व वाहन लुटून पाबोरा केल्याची घटना समोर आली आहे.
घोडबंदर रोडहून गुजरातकडे जाणाऱ्या चारचाकी चालक लोकेश रामअवतार शर्मा (वय २४) याने घोडबंदर रोड येथे दोन अज्ञात प्रवाशांना आपल्या चारचाकीत प्रवासी म्हणून बसवले. त्यानंतर पुढे लोकेशशी मैत्री करून अज्ञातांनी चारोटी नाक्याच्या पुढे वाईन शॉपहून दोन बीयर घेत लोकेशला प्यायाला दिल्या. या अज्ञातांनी बीयरमध्ये गुंगीचे औषध टाकले असल्याने लोकेशला गुंगी आली, त्यानंतर या दोघा प्रवाशांनी चालक लोकेशच्या खिशातील रोख रक्कम काढत त्याला वाहनाबाहेर काढत चारचाकी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. यात वाहन व मुद्देमाल असा एकूण तीन लाख २८०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी पळवला आहे. त्यानंतर शुद्धीवर आलेल्या लोकेशने जवळील तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण सदर घटना तुलसी हॉटेल येथील असल्याने ही हद्द कासा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येते, त्यानंतर लोकेशने कासा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. कासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com