बिलावलीत तळावाच्या सुशोभिकरण सुरू

बिलावलीत तळावाच्या सुशोभिकरण सुरू

वाडा, ता. १९ ( बातमीदार) : तालुक्यातील बिलावली गावातील तळावातील गाळ काढून व त्याचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम दिल्लीतील पीएचडी रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद पाटील यांच्या पाठपुराव्याने हे काम झाले असून तलावातील गाळ काढून त्यानंतर त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक ब्रिजमोहन पाल, शाखा अभियंता बनवारीलाल चतुर्वेदी, जिल्हा परिषद सदस्य मिताली बागुल, पंचायत समिती सदस्य कृपाली पाटील, केशव पाटील, मिलिंद बागुल, सरपंच सत्यवान पडवले, संदीप पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. तसेच या संस्थेने गावात पंधराशे झाडे देण्याचे जाहीर केले असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन ब्रिजमोहन पाल यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com