Sun, April 2, 2023

बेशिस्त वाहनचालकांना कौपरखैरणेत दणका
बेशिस्त वाहनचालकांना कौपरखैरणेत दणका
Published on : 19 March 2023, 11:37 am
नवी मुंबई (वार्ताहर)ः कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरक्षा व नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने राबलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १४७६ वाहनचालकांकडून १ लाख ६२ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून मार्च महिन्याच्या पंधरवड्यात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे वाहतूक शाखेने विना हेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, नो-पार्किंग, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर व इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १,४७६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.