आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव

आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशाचा जीव

पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात ट्रेनमधून खाली पडत असलेल्या एका प्रवाशाला आरपीएफचे जवान विशाल कवले यांनी पकडून ट्रेनमध्ये चढवल्याने या प्रवाशाचा जीव वाचला आहे. सदर घटना गुरुवारी दुपारी पनवेल रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शनिवारी दुपारी पनवेल रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर आलेली नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी सुटल्यानंतर एका प्रवाशाने धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र या वेळी एक्स्प्रेसने वेग घेतल्याने हा प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडणार होता. हा प्रकार रेल्वे स्थानकावर तैनात असलेले आरपीएफचे जवान विशाल कवले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशाला पकडत ट्रेनमध्ये अलगद चढवले. त्यामुळे हा प्रवासी रेल्वेखाली जाता-जाता वाचला. ही संपूर्ण घटना पनवेल रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा प्रवासी नेत्रावती एक्स्प्रेसमधून पुढे निघून गेल्याने त्या प्रवाशाची अधिक माहिती मिळू शकली नाही; मात्र आरपीएफचे हेडकॉन्स्टेबल विशाल कवले यांनी कार्यतत्परता दाखवून एका प्रवाशाचा जीव वाचवल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com