विफपाद्वारा मोफत नेत्र चिकित्सा शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विफपाद्वारा मोफत नेत्र चिकित्सा शिबिर
विफपाद्वारा मोफत नेत्र चिकित्सा शिबिर

विफपाद्वारा मोफत नेत्र चिकित्सा शिबिर

sakal_logo
By

मानखुर्द (बातमीदार) : वेस्टर्न इंडियन फिल्म अॅण्ड टीव्ही प्रोड्युसर असोसिएशन (विफपा) आणि लायन्स क्लब ऑफ मिलेनियमने अंधेरी पश्चिम येथील माहेश्वरी भवनात नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या नवव्या आयोजनात मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेते मुकेश ऋषी, राकेश बेदी, राजन मोदी, पाखी हेगडे, बी. एन. तिवारी, राघव ऋषी, आनंद बलराज, गुड्डी, राजेश, चांदनी सिंह, तसेच राजू ताक आदी कलाकारांनी हजेरी लावली होती. डॉ. प्रेम अग्रवाल, डॉ. प्रतीक अग्रवाल आणि डॉ. पूजा अग्रवाल यांच्या पथकाने मोफत इलाज केले. चित्रपट पाहण्यासाठी डोळेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच डोळ्यांची काळजी घेण्याबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या, तसेच त्यांच्या योग्य उपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने आयोजन करण्यात आल्याची माहिती विफपाचे अध्यक्ष संग्राम शिर्के आणि लायन्स क्लब ऑफ मिलेनियमचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी दिली. या वेळी पवन खेतान, दिलीप दळवी, धर्मेंद्र मेहरा, आनंद अग्रवाल उपस्थित होते.