जन आरोग्यअंतर्गत उपचार व्हावेत

जन आरोग्यअंतर्गत उपचार व्हावेत

जव्हार, ता. २० (बातमीदार) : आदिवासीबहुल भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॅप्टन विनित मुकणे यांनी निवेदन देवून मागणी केली आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या जव्हार रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड असे दोन तालुके व डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय आदिवासीबहुल भागामध्ये नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता जव्हार रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विभाग सुरू करून या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्यास नागरिकांच्या दृष्टीने लाभदायक होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जव्हार रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह अतिशय आधुनिकतेने सज्ज आहे. या ठिकाणी करारानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजना योग्य प्रकारे कार्यरत होऊन ही समस्या सुटू शकते. त्यामुळे या भागातील रुग्णांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होणार नाही. त्यामुळे या रुग्णालयातील हा विभाग प्रायोगिक तत्वावर सुरू करून संपूर्ण राज्य भरात तालुका ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालयात या पद्धतीने नियोजन केल्यास जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे होऊ शकते.

-----------------------
पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एक विभाग सुरू व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन मागवले आहे.
- डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय, जव्हार

----------------------
जव्हार रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येथील रुग्णांच्या हितासाठी एक विभाग हा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू ही प्रक्रिया संपूर्ण राज्यभरात संदर्भ सेवा रुग्णालयात करण्याचा मानस आहे.
- राजेंद्र गावित, खासदार, पालघर लोकसभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com