वरळी सीफेस अपघातातील आरोपीला पोलिस कोठडी

वरळी सीफेस अपघातातील आरोपीला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : वरळी सीफेसवर रविवारी झालेल्या अपघातप्रकरणी आरोपी वाहनचालक सुमेर मर्चंटला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरळी सीफेस येथे रविवारी सकाळी ४२ वर्षीय राजलक्ष्मी राजकृष्णन या महिलेचा सुमेरच्या गाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून २३ वर्षीय सुमेरला अटक केली होती.
सुमेरलाही अपघातात दुखापत झाली आहे. त्याच्या घरी शनिवारी रात्री मित्रांची पार्टी झाली होती. त्यानंतर तो मित्राला सोडायला शिवाजी पार्क येथे गेला असता त्याने हा अपघात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो ताडदेव येथे आपले पालक आणि धाकट्या भावासोबत राहत असून त्याचे पालक हिमाचल प्रदेशात गेल्याने त्याने आपल्या घरी मित्रासाठी पार्टी ठेवली होती. वाहन चालविताना त्याने मद्यप्राशन केले होते का हे अजून कळलेले नसून त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राजलक्ष्मी मुंबईतील आयटी कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होत्या. त्या माटुंगा पूर्वेकडील बालाजी गार्डन टॉवर येथील सातव्या मजल्यावर राहण्यास होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com