पावसामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप

पावसामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप

पालघर, ता. २१ (बातमीदार) : गावातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा असलेला केळवे गावातील केळवे बाजार-बसस्टॉप ते केळवे-जोगाळे दरम्यानचा मुख्य रस्ता नव्याने बनवण्यात आला आहे. त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आल्याने रस्त्याची उंची मूळ रस्त्यापासून जवळपास दीड फुटाने वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारांची व्यवस्था नसल्यामुळे मंगळवारी (ता. २१) पहाटे पडलेल्या अवकाळी पावसामुळे केळवे बाजार बस स्टॉप परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त आहे. अवकाळी पडलेल्या काही मिनिटांच्या पावसामुळे रस्त्यावर जवळपास एक फूटभर पाणी साचले होते.
बाजार बस स्टॉपपासून मुख्य रस्त्याच्या दुतर्फा १०० मीटर लांबी असलेल्या गटारांचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी गेली अनेक वर्षे प्रशासनाकडे करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यादरम्यान गुडघाभर पाणी साचते. काही मिनिटे कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे; तर संपूर्ण पावसाळ्यात रस्त्याची अवस्था काय होईल, असा प्रश्न नागरिकांतू विचारला जात आहे. नवीन रस्ता बनवताना त्याचे काँक्रीटीकरण झाल्याने वाढलेल्या उंचीमुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर रस्त्याच्या दुतर्फा काँक्रीट गटारांची व्यवस्था झाली नाही पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे.


---------------
केळी बाजार ते जोगाळे-केळवे रस्त्यावर काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आला आहे. रस्त्याची उंची वाढवल्यामुळे दोन्ही बाजूने गटाराची आवश्यकता होती; मात्र गटार न बनवल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने मंगळवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. गटारे पावसाळापूर्वी तयार करावी अशी आमची मागणी आहे.
- वैभव पाटील, सामाजिक कार्यकर्ता, केळवे

-----------------------
केळवे बाजार ते जोगाळे-केळवे रोड हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता झालेला आहे; मात्र केळवे शिवाजी चौक ते एसटी बस स्थानकापर्यंतचा दीडशे फूट लांबीचा रस्ता काही दिवसात होणार आहे. त्याच वेळेला रस्त्याच्या दुतर्फा गटाराचे कामही हाती घेण्यात येणार आहे. अवकाळी पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. मजूर लावून पाणी दूर करण्यात आले आहे.
- संदीप कीणी, सरपंच, ग्रामपंचायत केळवे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com