कृषी क्षेत्राला बूस्‍टर

कृषी क्षेत्राला बूस्‍टर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २१ : जिल्‍हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी यंदा १७ कोटी ७० लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेगवा लागवड, पांढऱ्या कांद्याची लागवड, शेततळे खोदण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आल्‍याने कृषी क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत रायगड जिल्हा परिषदेने आर्थिक वर्षासाठी ७९ कोटी २० लाख ९४ हजार ५०० रुपयांचा अर्थसंकल्प सोमवारी सायंकाळी सादर केला. मागील अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्‍या अर्थसंकल्पात १२ कोटी ४५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आगामी वर्षासाठी आर्थिक तरतूद करताना ७७ कोटी ७८ लाख ७९ हजार रुपये एकूण खर्च दाखवण्यात आला आहे. यात मागील वर्षाच्या १ कोटी ४२ लाख १५ हजार रुपयांच्या शिलकीसह ७९ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्या दालनात मुख्य लेखाधिकारी भगवान घाडगे यांनी सादर केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, माध्यमिक शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रशांत राऊत, वरिष्ठ लेखाधिकारी प्रशांत जगताप, लेखाधिकारी प्रभाकर भोपी उपस्थित होते.


जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, महिला, शेतकरी, अपंग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीची इमारती व जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्राप्त करून देऊन विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी

अर्थसंकल्पातील तरतूदी
शिक्षण ः ६ कोटी ७१ लाख
इमारती व दळणवळण ः १७ कोटी ७८ लाख
पाटबंधारे ः १ कोटी २७ लाख,
सार्वजनिक आरोग्य ः १ कोटी ९१ लाख
नागरी सोयी-सुविधा १३ कोटी १५ लाख
कृषी ः १७ कोटी ७० लाख
पशुसंवर्धन ः २ कोटी ७३ लाख
समाजकल्याण ः १२ कोटी,
अपंगकल्याण ः ३ कोटी,
महिला व बालकल्याण ः ७ कोटी

२०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प
मागील वर्षाच्या सुधारित ९० कोटी ७९ लाख ४३ हजार ४०९ रुपये खर्चाचा अर्थसंकल्पही सोमवारी मांडण्यात आला. मार्च २०२२ मध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ६६ कोटी ७५ लाख ६६ हजार रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. या मूळ अर्थसंकल्पात २४ कोटी ३ लाख ७७ हजार ४०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com