सहसंचालक कार्यालय मुंबई विभागात समाविष्ट करा

सहसंचालक कार्यालय मुंबई विभागात समाविष्ट करा

विरार, ता. २२ (बातमीदार) : कोकणातील महाविद्यालयांना प्रवासाच्या दृष्टीने सोईचे व्हावे, यासाठी नवीन सहसंचालक कार्यालय, कोकण विभाग, पनवेल येथे सुरू करण्यात आले आहे. कोकण विभागीय कार्यालयास ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व पदवी महाविद्यालये वर्ग करण्यात आलेली आहेत. ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातून पनेवल येथील सहसंचालक कार्यालयात जाणे-येणे हे आर्थिकदृष्ट्या खर्चिक, वेळेचा अपव्यय करणारे तसेच महिला कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीचे आहे. त्यासाठी ठाणे आणि पालघरमधील महाविद्यालयांना सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण, मुंबई विभागात समाविष्ट करा, अशी मागणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केली. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्‍नावर सकारात्मक निर्णय घेण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com