ज्येष्ठ नागरिकांसाठी 
रेल्वेत सवलत सुरू करा

ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेत सवलत सुरू करा

मुंबई, ता. २१ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद केली होती. त्याचा फटका देशातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. ही सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा जोर धरत आहे; मात्र केंद्र शासनाकडून अद्याप त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवार यांना ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे सवलत तात्काळ सुरू करा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महासंघाला दिले. या वेळी महासंघाचे अध्यक्ष विश्वास भदाणे आणि सहकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com