परदेशातील नोकरीच्या नावाने फसवणूक

परदेशातील नोकरीच्या नावाने फसवणूक

मुंबई, ता.२१: परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवत खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या आरोपीविरोधात केरळ येथील पीडित आणि अमेरिकन दुतावासाच्या तक्रारीवर बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
फिर्यादी आलफिन राफिल हे केरळच्या त्रिशूर जिल्ह्याचे रहिवासी असून ते एर्नाकुलम येथील एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून नोकरी करतात. त्यांची परदेशात नोकरी करण्याची इच्छा असल्याने मागील वर्षी त्यांनी पासपोर्ट बनवले. एर्नाकुलम येथेच परदेशात नोकरी देणारी कंपनी कार्यरत होती. राफिल यांनाही परदेशात जायचे असल्याने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी राफिल यांना परदेशात जाण्यासाठी व्हिसा काढून देण्यासाठी ५० हजारांची मागणी केली. पुढे व्हिसासाठी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या बीकेसी येथील अमेरिकन दुतावासाच्या कार्यालयात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे पीडीत राफिल यांनी आरोपी सुनील कृष्णन याच्यावर विश्वास ठेवत सांगितल्याप्रमाणे १७ मार्चला मुंबईत बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केली.
मुलाखतीसाठी दुतावासाने राफिल यांना २० मार्चला बोलावले, मात्र कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आले. सदर कागदपत्रे एजंट सुनील कृष्णनने ऑनलाईन पद्धतीने सादर केल्याचे राफिल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राफिल आणि दुतावासातील अधिकाऱ्यांनी सुनील कृष्णन विरोधात गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com