
मुंब्र्यातील उम्मीद फाउंडेशनच्या पथकाचा गौरव
दिवा, ता. २१ (बातमीदार) : मुंब्रा उम्मीद फाऊंडेशनने लष्करी भरतीसाठी आलेल्या युवकांसाठी केलेल्या कौतुकास्पद कामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने एम. एम. व्हॅली येथील उम्मीद स्कूलमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक राजन किणे होते. या वेळी शाळेतील विशेष मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरवदे सुभेदार, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी प्रवीण सुभेदार, रोटरी क्लब ठाणेच्या सदस्या व प्राध्यापिका उषावती शेट्टी, उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष परवेझ फरीद आदी उपस्थित होते. उमेद फाऊंडेशनच्या चमूने केलेले हे कौतुकास्पद काम पाहून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उम्मीद फाऊंडेशनच्या युवा स्वयंसेवकांनी मानवतेचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. याशिवाय सैन्यात भरती होण्यासाठी आलेल्या तरुणांना सोयी-सुविधांकरिता अनेक प्रयत्न केले. या कार्याची दखल घेत त्यांचा जिल्हा दंडाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.