घोणस सापाचा तरुणाला दंश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोणस सापाचा तरुणाला दंश
घोणस सापाचा तरुणाला दंश

घोणस सापाचा तरुणाला दंश

sakal_logo
By

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः वाशीनाका येथील सह्याद्री नगर परिसरातील एका तरुणास अचानक विषारी सापाने दंश केला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारांकरिता सायन पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अब्दुल शेख (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे.

वाशीनाका परिसरातील सह्याद्री नगर हा डोंगराळ भाग आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे या परिसरात सतत सापाचा वावर पाहायला मिळतो. या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेली आहे. दोन दिवसांपासून मुंबईत अचानक अवकाळी पाऊस पडत असल्याने डोंगरातील साप बाहेर पडून सुक्या जागेचा आधार घेत आहेत. याच परिसरातील अब्दुल शेख हा घरासमोर साफसफाई करीत होता. तेथील सिमेंट पत्रा उचलत असता विषारी घोणस सापाने त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दंश केला. तात्काळ त्याने व त्याच्या भावाने सर्पमित्र राहुल जाधव यांना माहिती दिली. सर्पमित्राने तात्काळ घटनास्थळी येऊन सापाला पकडून ऐरोली जंगलात सोडले; तर जखमीला उपचारांकरिता सायन येथील टिळक रुग्णालयात दाखल केले आहे.