राज्यात इन्फ्लुएंझाचे अल्पावधित दुप्पट रुग्ण

राज्यात इन्फ्लुएंझाचे अल्पावधित दुप्पट रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : गेल्या पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात इन्फ्लूएंझा ए (एच३एन२) मुळे आजारी पडणाऱ्या नागरिकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. १ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत नोंदवलेल्या आकडेवारीच्या तुलनेत १६ मार्च ते २० मार्चदरम्यान एच३एन२ची प्रकरणे दुप्पट झाली आहेत. आतापर्यंत राज्यात इन्फ्लूएंझाच्या सात मृत्यूंची नोंद झाली आहे. एच१एन१ आणि एच३एन२ पैकी तीन मृत्यूंचे निदान झाले आहे.
तज्ज्ञांनी या वाढीचे कारण तापमानातील चढ-उतार असल्याचे सांगितले आहे. इन्फ्लूएंझा विषाणू हवामानातील सततच्या बदलांमुळे अधिक वाढतो. म्हणूनच डॉक्टरांनी फ्ल्यूची लक्षणे दर्शविणाऱ्यांसाठी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात १ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत केवळ ११९ एच३एन२ रुग्णांची नोंद होती. यात वाढ होऊन १६ मार्च ते २० मार्चदरम्यान २४९ एवढी रुग्णसंख्या झाली आहे. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात एच३एन२ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
रुग्णालयात येणाऱ्या जवळपास ६० ते ७० टक्के रुग्णांमध्ये फ्ल्यूची लक्षणे असतात; म्हणजेच १० पैकी ६ रुग्णांना फ्ल्यूची लक्षणे आढळतात. गेल्या २-३ आठवड्यांत अनेक गर्भवती स्त्रिया फ्ल्यूची लक्षणे घेऊन येत आहेत, असेही सांगण्यात आले. औषधांना प्रतिसाद न दिल्यास केवळ काही रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, जास्त वय आणि अनेक कॉमोरबिडीटी असलेल्या रुग्णांना काळजी घ्यावी लागते. शिवाय बरे होण्यास वेळ लागतो.
...
एच३एन२ रुग्णांमध्ये वाढ झाल्याने तापाचे रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. आम्हाला आढळले आहे की, बहुतेक कोविड रुग्णांना लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका
...
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्व विषाणूजन्य श्वसनाच्या आजारांमध्ये सातत्याने वाढ होण्यामागे दोन मुख्य घटक आहेत. एक विषाणू आणि दुसरे वातावरण. विषाणू संसर्गांच्या कारणांमध्ये मास्क टाळणे, सामान्य आरोग्याबद्दल अनौपचारिक दृष्टिकोन, हाताच्या स्वच्छतेचा अभाव आणि अधिक सामाजिक मेळावे यांचा समावेश होतो. पर्यावरणीय घटकांमध्ये हवेची खराब गुणवत्ता आणि अनेक ठिकाणी सुरू असलेली बांधकामे कारणीभूत ठरतात.
...
आजारांत वाढ अशी
१ ते १५ मार्च एच३एन२चे रुग्ण - ११९
१६ ते २० मार्च दरम्यान वाढ - २४९
एकूण एच१एन१ रुग्ण- ४१७
एकूण एच३एन२ - २४९
एच१एन१ मृत्यू -३
एच३एन२ मृत्यू -१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com