Sat, June 3, 2023

उल्हासनगरात शिवसेनेची बाईक रॅली
उल्हासनगरात शिवसेनेची बाईक रॅली
Published on : 22 March 2023, 11:37 am
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : नववर्ष स्वागत यात्रेच्या गुढीपाडवा निमित्ताने उल्हासनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदयात्रा व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गावदेवी मंदिराचे दर्शन घेतल्यावर श्रीराम चौक, मुख्य रोडने ३० सेक्शन आणि संतोष नगर शिवसेना शाखेपर्यंत रॅली काढण्यात आली. या वेळी कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, समनव्यक धनंजय बोडारे, महिला आघाडी संघटक जया तेजी, माजी नगरसेविका शीतल बोडारे, वसुधा बोडारे, पदाधिकारी बापू सावंत, विजय सावंत, प्रकाश माळी, परमानंद गेरेजा, भाऊ म्हात्रे, ज्ञानेश्वर करवंदे, संतोष हांडे, स्वप्निल तरे, ऍडव्होकेट आकाश सोनवणे, संजय शेलार, रेखा येवले, शुभांगी शेलार, अश्विनी जंजिरे, शुभांगी शिंगटे यांच्यासह महिला-पुरुष, तरुण-तरुणी सहभागी झाले होते.