स्वागतयात्रांनी नववर्षाचे स्वागत

स्वागतयात्रांनी नववर्षाचे स्वागत

वसई, ता. २२ (बातमीदार) : गुडीपाडवा म्हटले की शोभायात्रा हे समीकरण अनेक वर्षांपासून शहरात रुजले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन गुडीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या या शोभायात्रांमधून होत असते. यानिमित्त पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.
कोरोनाकाळात सणांवर आलेल्या बंधनामुळे काही काळ या उत्साह कमी झालेला दिसत होता; पण यंदा मात्र गुढीपाडव्याला सर्वत्र उत्साह संचारल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी निघालेल्या शोभायात्रांमधील मराठमोळी पारंपरिक वेशभूषेसह मराठी साहसी खेळांचे सादरीकरण केले गेले. या वेळी ढोल-ताशांचा गजर निनादत होता, तर लेझीम पथकानेदेखील नागरिकांना आकर्षित केले.
वसई नवघर माणिकपूर येथील साईनगर, संतनगर, विद्यामंदिर मार्ग, पंचवटी नाका, अंबाडी रोड, केटी नगर ते साईनगर मैदान या मार्गावर शोभायात्रा काढण्यात आली. यात नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. साईनगर उत्सव समिती व शहरप्रमुख संजय गुरव पारंपरिक वेशभूषा करत सहभागी झालेल्या नागरिकांना बक्षीस देण्यात आले. यात महिलांसाठी पाहिले बक्षीस सोन्याची नथ व दुसरे बक्षीस पैठणी यासह अन्य आकर्षक बक्षिसेदेखील देण्यात आली. याप्रसंगी तालुकाप्रमुख राजाराम बाबर, उपशहरप्रमुख शशिभूषण शर्मा, विश्वनाथ तळेकर, शहरप्रमुख संजय गुरव आदी उपस्थित होते; तर आमची वसई सामाजिक संस्थेनेदेखील वसईत शोभायात्रेचे आयोजन केले होते. यासह नालासोपारा शिवसेना, उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, अनेक सामाजिक संस्थांनीदेखील विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
---------------
वसई : वसई पश्चिम येथे मोठ्या उत्साहत शोभायात्रा काढण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com