शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्तीवर कारवाई करा ः गाणार

शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्तीवर कारवाई करा ः गाणार

मुंबई, ता. २२ ः आधार व्हॅलिडेशननंतर अंतिम झालेल्या संच मान्यतेनुसारच शाळांमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करणे बंधनकारक होते. असे असतानाही संच मान्यतेपूर्वीच आदेशातील बंधने टाळून अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्या. यादरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच अशा नियमबाह्य नियुक्तींना मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी एका लेखी निवेदनाद्वारे राज्याचे शिक्षण आयुक्त तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.

वित्त विभागाच्या मान्यतेस अनुसरून आधार व्हॅलिडेशननंतर अंतिम झालेल्या संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांपैकी शिक्षकांची अत्यावश्यक असलेली १४७४ रिक्त पदे भरण्यासंदर्भात पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले होते, परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष करून राज्यातील अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात भरण्यात आली. विशेष म्हणजे या नियुक्त्यांना संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मान्यता देऊन शालार्थ आयडीदेखील दिला. या गंभीर बाबींकडे नागो गाणार यांनी आपल्या पत्रात शिक्षण आयुक्तांचे लक्ष वेधत या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शासनाचे आदेश डावलून नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांच्या नियुक्त्या करणे आणि त्यांना त्वरित शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यतेसह शालार्थ आयडी देणे ही अत्यंत गंभीर बाब असून याविषयी सखोल चौकशी होऊन सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागो गाणार यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com