दरात घसरण; गुढीपाडव्याला सोन्यासाठी वेटिंग

दरात घसरण; गुढीपाडव्याला सोन्यासाठी वेटिंग

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्षाची सुरुवात असलेल्या गुढीपाडव्यासाठी शहरातील सराफा बाजारात बुधवारी (ता. २२) सोने खरेदीसाठी सकाळी, सायंकाळी गर्दी झाली होती. सोन्याच्या दरात सहाशे रुपयांची घसरण झाल्याने मुहूर्तावर सोने खरेदीसाठी काही शो-रूममध्ये ग्राहक वेटिंगवर असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
गुढीपाडव्याला लग्नसराईच्या अनुषंगाने तयार दागिन्यांसह वेढणी, कॉइन, मणीमंगळ सूत्र, कानातील डूल, नाकातील नथ, अंगठी आदी दागिन्यांना अधिक मागणी होती. सोन्याचे दर केव्हा वाढतील व केव्हा कमी होतील, हे सांगता येत नाही. सोन्याचे बिस्कीट खरेदी केल्यास त्यात विक्रीवेळी होणारी घट होत नाही. यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या बिस्किटाला बुधवारी चांगली मागणी होती. ज्येष्ठांचा चोख सोने, तर तरुणाईचा कमी वजनाचे, हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याकडे कल होता. सोने सुरक्षित गुंतवणूक, तसेच चांगले रिटर्न देत असल्याने सोने महागले, तरी नागरिकांनी खरेदी केली. दुपारी अचानक सहाशे रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झाल्याने दुपारनंतर सोने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागल्याचे चित्र आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये पाहावयास मिळाले. सकाळी दर ५९ हजार रुपये प्रतितोळा होते. दुपारनंतर त्यात सहाशेची घसरण होऊन ते ५८ हजार ४०० वर (विना जीएसटी) आले. यामुळे ग्राहकांचा सहाशे रुपयांचा फायदा झाला.

कोट
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी सकाळपासून गर्दी होती. दुपारी भाव कमी झाल्यानंतर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. अनेकांना सोने खरेदीसाठी वेटिंग करावी लागली. पारंपरिक दागिन्यांसोबतच नवीन डिझाईन, लाईटवेटेड दागिन्यांना मागणी होती.
- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com